6 May 2024 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

नागपूरचा बालेकिल्ला ढासळला | माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदासंघात भाजपाचा मोठा पराभव

Congress candidate Abhijit Vanjari, Nagpur constituency election 2020, Devendra Fadnavis

नागपूर, ४ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.

पुणे आणि नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भारतीय जनता पक्षाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला (Congress candidate Abhijit Vanjari won Nagpur constituency election 2020). नागपूर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे.

नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भारतीय जनता पक्षाकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

 

News English Summary: Congress’ Vanjari had taken the lead from the first round. Bharatiya Janata Party’s Sandeep Joshi was second. This lead was maintained and Bharatiya Janata Party’s Joshi lost by a large margin. Nagpur constituency has been the stronghold of the Bharatiya Janata Party.

News English Title: Congress candidate Abhijit Vanjari won Nagpur constituency election 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x