5 May 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

पडळकरांच्या आडून जाणकरांना बाजूला केलं? | फडणवीसांशी भांडण असल्याचंही मान्य केलं

RSP President Mahadev Jankar, Devendra Fadnavis, Gopichand Padalkar

पंढरपूर, ९ डिसेंबर: महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. पण गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या NDAमध्येच आहोत आणि पुढेही NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर म्हणाले.

दरम्यान, धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला हाणला.

विशेष म्हणजे महादेव जाणकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणामुळे देखील महादेव जाणकार यांना बाजूला सारलं गेल्याच म्हटलं जात. त्यामुळे महादेव जाणकार हे सध्या राज्यातील राजकारणाच्या बातम्यांमध्ये देखील झळकत नव्हते, मात्र पवारांची भेट झाली पुन्हा प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, महादेव जाणकर सत्तेत राहिले नाहीत तर त्यांचे पदाधिकारी देखील त्यांना सोडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत, अशा चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Mahadev Jankar, president of the Rashtriya Samaj Party, an ally of the BJP in Maharashtra, has expressed his displeasure. There is a quarrel between me and the Leader of the Opposition Devendra Fadnavis. But I will not let anyone else benefit from it. Therefore, Jankar has clarified that he will stay with BJP. Jankar had come to Baramati today for a private function. At that time, he interacted with the media.

News English Title: RSP President Mahadev Jankar express anger against Devendra Fadnavis and Gopichand Padalkar news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x