3 May 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

गुजरातमध्ये कोरोना काळात २१.८% घरांमध्ये एकवेळचे जेवणही बनलं नाही - सर्वेक्षण

Hunger watch, research revealed, Gujarat households, Not make a meal

गांधीनगर, १२ डिसेंबर: २०२० हे वर्ष लवकरच संपेल. कोरोना आपत्तीने कंटाळल्यामुळे प्रत्येकजण आता नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात लॉकडाउनमुळे करोडो लोक अनेक महिने घरातच अडकून पडले. त्यात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग पायीच चालत स्वतःच्या राज्यात नाहीतर गावाकडे पोहोचला होता. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

परंतु आर्थिक स्थितीमुळे अद्याप अनेक लोकांचे जीवन पूर्वपदावर आलेले नाही. परिणामी देशातील बर्‍याच भागात भूकबळींची भीती निर्माण झाली होती. त्यालाच अनुसरून अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत एक सर्वेक्षण करण्यात आले. अन्न सुरक्षा अभियान (गुजरात) अंतर्गत नुकत्याच झालेल्या ‘हंगर वॉच’ सर्वेक्षणात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यानुसार राज्यात तब्बल २०.६ टक्के कुटुंबांकडे धान्य नसल्याने घरात जेवण शिजू शकलं नाही. त्याच वेळी, २१.८ टक्के घरातील लोकांना एकवेळचे जेवण सुद्धा घरी बनवता आले नाही. अहमदाबाद, आनंद, भरूच, भावनगर, दाहोद, मोरबी, नर्मदा, पंचमहाल आणि वडोदरा या नऊ जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले.

लॉकडाउन संपल्यानंतर पाच महिन्यांनंतर देखील उपासमारीची परिस्थिती बर्‍यापैकी गंभीरच असल्याचे हंगर वॉचच्या सर्वेक्षणातून दिसून आले. त्याच वेळी, 45 टक्के कुटुंबांमध्ये अन्न खरेदी करण्यासाठी पैसे उधारीवर घेण्याची वेळ ओढावल्याचे सर्वेक्षण सांगतं.

 

News English Summary: Many people’s lives have not yet been restored due to the economic situation. As a result, there were fears of famine in many parts of the country. This was followed by a survey under the Food Security Campaign. A recent ‘Hunger Watch’ survey conducted under the Food Security Mission (Gujarat) has revealed a shocking fact. As many as 20.6 per cent households in the state could not cook food at home due to lack of food grains. At the same time, 21.8 percent of households could not even make a one-time meal at home. The survey was conducted in September and October in nine districts of Ahmedabad, Anand, Bharuch, Bhavnagar, Dahod, Morbi, Narmada, Panchmahal and Vadodara.

News English Title: Hunger watch research revealed 21 percent of Gujarat households could not make a last meal News updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x