2 May 2025 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health Benefits of Custard Apple | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की जाणून घ्या

Benefits, Eating custard apple, health article

मुंबई, २१ डिसेंबर: आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण अनेक फळांचं सेवन करत असतो. विविध फळांचे विविध फायदे होतात. आज आपण सीताफळ खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याबाबत माहिती घेणार आहोत. सीताफळात लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं शरीरासाठी हे फळ खूप गुणकारी आहे. अनेकांना हे फळ खूप आवडतं.

सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Benefits of eating custard apple for health :

सिताफळ हे एक सिझनल फळ आहे. सध्या बाजारात सिताफळं मिळायला सुरूवात झाली आहे. वास्तविक प्रक्रिया करून तुम्ही सिताफळ अगदी वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवू शकता. पण जे फळ ज्या हंगामात पिकतं ते त्याच सिझनमध्ये खाण्यात एक वेगळीच मौज असते. हंगामी काळात ते फळ अगदी ताज्या स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे चांगले फायदे आरोग्यावर होत असतात. सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.

सीताफळ खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे: (Benefits of eating custard apple)

  • अशक्तपणा दूर होतो.
  • हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतं.
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठीही सीताफळाच्या सेवनाचा खूप फायदा होतो.
  • सीताफळात लोह जास्त असल्यानं गरोदर महिलांना याचा जास्त फायदा होतो.
  • याच्या सेवनामुळं रक्तदाब नियंत्रणात रहातो
  • छातीत किंवा पोटात जळजळ होत असेल तर त्याचा त्रासही कमी होतो.
  • पचक्रिया सुधारण्यासाठीही हे खूप फायदेशीर असते.

सिताफळामधील पोषकतत्वं:
सिताफळामध्ये अनेक पोषक घटक असतात. सिताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6 असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. एका सिताफळामुळे तुमच्या दिवसभराच्या व्हिटॅमिन्सची गरज नक्कीच भागवली जाऊ शकते. शिवाय त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फॉफ्सरस, सोडीयम, लोह आणि पुरेसे फायबर्स असतात. ज्याचा तुमच्या आरोग्य, त्वचा आणि केसांवर चांगला फायदा होतो.

News English Summary: Custard apple contains many nutrients. Custard apple contains Vitamin C, Vitamin A, Vitamin B6 which helps in proper nutrition of your body. An apple can definitely meet your daily vitamin needs. It also contains potassium, magnesium, phosphorus, sodium, iron and enough fiber. Which is good for your health, skin and hair.

News English Title: Benefits of eating custard apple for health article updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या