29 April 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

फुकट लस घोषणा | अनुभवाप्रमाणे मोदी सरकारची पलटी | केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव

Covid 19 vaccine, Vaccination, free of cost, U turn

नवी दिल्ली, २ जानेवारी: देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली होती.

दिल्लीतील GTB रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मी आवाहन करतो आहे की कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. सुरक्षा आणि लसीची कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

मात्र वृत्त प्रसिद्ध होताच लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली.

 

News English Summary: The vaccine will be given free of cost in the first phase of vaccination. The vaccine will be supplied across the country. Priority will be given to vaccinating 1 crore health care workers and 2 crore first tier workers. The details of how the 27 crore priority beneficiaries will be vaccinated will be decided by July, ”said the Health Minister, addressing the announcement of free vaccines.

News English Title: Covid 19 vaccine will be provided free of cost across the country News updates.

हॅशटॅग्स

#Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x