3 May 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Health First | हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी | वाचा सविस्तर

Dinkache ladoo, beneficial, health article

मुंबई, २ जानेवारी: खरंतर डिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. परंतु त्याच्यात असणाऱ्या उष्णतेच्या गुणधर्मामुळे तो फारसा खाल्ला जात नाही. खाण्याचा डिंक हा वनस्पतींपासून मिळवला जातो. शक्यतो बाभूळ झाडावरचा डिंक हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. बाभूळ म्हणजे सुबाभूळ नव्हे तर काटे बाभूळ. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र ,पंजाब या राज्यांमध्ये बाभळीच्या झाडावर जो डिंक तयार होतो तो उन्हात वाळवला जातो. आणि तोच डिंक खाण्यासाठी वापरतात.

बाभळीच्या झाडाचे औषधी गुणधर्म या डिंका मध्ये उतरतात. हा डिंक पाण्यामध्ये विरघळतो. म्हणूनच शेळीचे दूध सकस मानले जाते कारण हे प्राणी बाभाळीचा पाला खातात. हिवाळ्यात हवा थंड असते. या काळात मात्र डिंक खाल्ला तर त्याचा त्रास होत नाही म्हणूनच मग डिंकाचे लाडू खाण्याचा हिवाळा हा ऋतू मानला जातो. या काळात घरोघरी पारंपारिक पद्धतीने लाडू बनवले जातात. डिंक आणि ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, पिस्ता, खोबरं खसखस, भोपळा आणि खरबुजच्या बिया, आणि शुद्ध देशी तूप व गूळ वापरून लाडू बनवले जातात.

आयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात. याचाच अर्थ डिंक आजारपणापासून आपल्याला दूर ठेवतो. त्याचप्रमाणे डिंकामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ज्या लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी आहे त्यांनी हे डिंकाचे लाडू खाणे गरजेचे असते.

बदलत्या ऋतुनुसार प्रत्येकाचे खाणे-पिणे देखील बदलते. हिवाळ्यात शक्यतो गरम पदार्थ खाल्ले जातात. विशेष करुन हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडवाचे सेवन केले जाते. तसेच स्तनपान देणाऱ्या मातांना देखील डिंकाच्या लाडूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. चला तर जाणून घेऊया डिंकाचे लाडू खाल्ल्याने कोणते फायदे होतात.

हाडे मजबूत होतात:
रात्री झोपण्याच्या आधी कोमट दुधासह डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

अशक्तपणा दूर होतो:
बऱ्याचदा गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना डिंक खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन डिंकचे सेवन केल्याने गरोदरपणात शरीरातील दुर्बलता दूर होते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते:
डिंकाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाडण्यास मदत होते. सर्दी टाळण्यासाठी हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे चांगले मानले जातात.

बद्धकोष्ठता होते दूर:
दररोज एक ते दोन डिंकाच्या लाडूंचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

सांधेदुखीचा त्रास:
बहुतेकदा हिवाळ्याच्या दिवसात संयुक्त वेदना होतात आणि त्यांना चालण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून डिंकाचे लाडू खाणे फायद्याचे ठरू शकते. म्हणून जर आपल्याला हिवाळ्यात निरोगी रहायचे असेल तर रात्री किमान गरम पाण्यात एक लाडू घ्या.

 

News English Summary: In fact, gum is a very useful substance for your body. But due to its heat properties, it is not eaten much. Edible gum is obtained from plants. Possibly the gum on the acacia tree is considered the best. Acacia is not acacia but acacia. In Gujarat, Rajasthan, Maharashtra and Punjab, the gum formed on the acacia tree is dried in the sun. And use the same to eat gum.

News English Title: Dinkache ladoo beneficial for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x