20 September 2020 10:52 PM
अँप डाउनलोड

अयोध्या भुमिपुजनाआधी मुस्लिम लॉ बोर्डचे वादग्रस्त ट्वीट, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह

All India Muslim personal law board, Babrimasjid, Bhumipujan in Ayodhya, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ४० किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

असं सांगितलं जात आहे की, महंत नृत्य गोपाळ दास यांनी मणि राम दास छावनी पीठ यांच्यातर्फे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी 40 किलोची चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. महंत कमल नयन दास, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दासचे उत्तराधिकारी आहेत. मणि राम दास छावनी पीठ हे महंत नृत्य गोपाल दास यांचं निवास स्थान आहे. अयोध्येतील सर्व प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा याच ठिकाणाहून आखण्यात येते.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला. पण आता ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेयत. हागिया सोफिया मशिदीचे उदाहरण देत बाबरी मशिद कायम राहील असं म्हटलंय.

बाबरी मशिद होती आणि कायम राहील असे ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या अधिकृ ट्वीटर हॅंडलवरुन म्हटलंय. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायकारक, लाजिरवाणा, एकतर्फी निर्णयाद्वारे जमीनीवर होणारे पुनर्निमाण इतिहास बदलू शकत नाही. दु:खी होण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती कायम राहत नाही. असे मुस्लिम लॉ बोर्डने म्हटलंय.

पुन्हा मशिदीत रुपांतरीत झालेली हागिया सोफिया ही १५०० वर्ष जुनी वास्तू जागतिक वारसामध्ये रुपांतरीत झालीय. जुलै महिन्यामध्ये टर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी ऐतिहासिक म्युझियम पुन्हा मशिदीत बदलण्याचे आदेश दिले. १४३४ मध्ये इंस्ताबुलवर हल्ला केल्यानंतर उस्मानीशाहीने मशिदीत बदललेल्या हागिया सोफियाला एक म्युझियम बनवले. या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक बदल झाले. जेव्हा ही इमारत बनली तेव्हा भव्य चर्च होती. त्यानंतर हे मशिदीत रुपांतरीत झाली राष्ट्रपती एर्दोगन यांनी १९३४ मध्ये हा ऐतिहासिक निर्णय बदलला.

 

News English Summary: Following the Supreme Court decision, it was decided to build a Ram temple on the disputed site. But now the All India Muslim Personal Law Board is once again questioning the Supreme Court’s decision. Giving the example of Hagia Sophia Mosque, it is said that Babri Masjid will remain.

News English Title: All India Muslim personal law board tweets on Babrimasjid before Bhumipujan in Ayodhya by PM Narendra Modi News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#RamMandir(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x