6 May 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे | आरोग्यमंत्र्यांची माहिती

Corona new strain, corona virus, In Maharashtra, minister Rajesh Tope

मुंबई, ४ जानेवारी: कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मागील आठवड्यात देशातल्या सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली गेली. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणचा, वितरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज्यातील ८ जणांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती याच बैठकीतून समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संवाद साधला आणि त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

 

News English Summary: A new strain of corona virus has finally entered Maharashtra. Health Minister Rajesh Tope himself has said that symptoms of new corona were found in 8 passengers from Maharashtra returning from Britain. Therefore, the concern of Maharashtra has increased again.

News English Title: A new strain of corona virus has finally entered Maharashtra said health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x