29 April 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आंदोलक शेतकरी बर्ड फ्लू पसरवत असल्याचा प्रचार करणे खेदजनक - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू

Allegations, farmers protest, Spreading bird flu, Kaushik Basu

नवी दिल्ली, १० जानेवारी: दिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार मदन दिलावर यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मदन दिलावर यांचे हे विधान सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भाजप आमदार दिलावर म्हणाले की, शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरवण्यामध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. दरम्यान, दिलावर यांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये दहशतवादीही लपून बसल्याचीही शंका व्यक्त केली. तसेच मोठ्या संख्येने रस्ता अडवून बसलेल्या आंदोलकांना आता सरकारने रस्त्यावरून उठवले पाहिजे अन्यथा बर्ड फ्लूसारखे घातक आजार फैलावून हे शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन देशामध्ये मोठे संकट निर्माण करेल.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून जागतिक ख्यातीचे आणि वर्ल्ड बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी टीका तसेच खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना कौशिक बासू यांनी म्हटलं आहे की, “आंदोलक शेतकरी बर्ड फ्लू पसरत असल्याची टीका करणं हे अत्यंत खेदजनक आहे. कृषी कायद्याचा निषेध करणारे शेतकरी हे आदरणीय आहेत, ते केवळ त्यांच्या स्वार्थासाठीच नव्हे तर लोकशाही हक्कांच्या मोठ्या कारणास्तव उभे आहेत. त्यांचं म्हणणं एकूण घेण्यास ते पात्र आहेत, असं बासू यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The attack on Indian farmers, including the charge that they are spreading bird flu, by small right-wing groups is sad. The protesting farmers have been honorable, standing up not just for their own interest but for the larger cause of democratic rights. They deserve to be heard said Kaushik Basu.

News English Title: Allegations that farmers are spreading bird flu is Sad said Kaushik Basu news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x