8 May 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

VIDEO | उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला | महापुरात 150 ते 200 लोकं बेपत्ता असण्याची शक्यता

Joshimath taluka, Uttarakhand

देहराडून, ०७ फेब्रुवारी: उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत.

या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 150 ते 200 जण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, अनेक लोक दोन वीज प्रकल्पांवर काम करत होते. जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर काम करत असलेले अनेक लोक बेपत्ता आहेत.

दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज प्रकल्पांवर काम करत असलेल्या 100 ते 150 लोकांबाबत कोणतीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

 

News English Summary: A very unfortunate incident has taken place in Joshimath taluka of Uttarakhand. The Dhauli Ganga river has been flooded due to a big avalanche at Joshimath. It is feared that many people have been swept away by the floods. Therefore, an alert has been issued in Joshimath taluka. The accident happened at 10.55 this morning. The snow fell in Raini village in Joshimath taluka. Therefore, the river Dhauli Ganga has been flooded. Due to the breakage of the dam, water has flooded the area and many houses and people have been swept away.

News English Title: A very unfortunate incident has taken place in Joshimath taluka of Uttarakhand news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x