3 May 2025 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुकेश अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला मान्यता मिळावी म्हणून भाजपने हा कट रचला

BJP, Helipad on Mukesh Ambani, Nana Patole

मुंबई, १० मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला. (The BJP made the plan for getting permission to helipad on Mukesh Ambanis house said Nana Patole)

२००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घात पात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता,” असेही पटोले यावेळी म्हणाले. राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षानेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.

तसेच रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली होती परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

 

News English Summary: There is a helipad on the house of industrialist Mukesh Ambani. But its use is not allowed and the farmers’ agitation is causing huge financial losses as the shares of Mukesh Ambani’s companies are falling in the market. It is the Bharatiya Janata Party (BJP) that has come up with the case of the explosive-laden vehicle to garner sympathy and to allow the helipad for security reasons, “Congress state president Nana Patole told the media.

News English Title: The BJP made the plan for getting permission to helipad on Mukesh Ambani’s house said Nana Patole news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या