17 May 2024 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

लोकांच्या संकटातही संधी | भाजप नेत्याकडून ऑक्सिजन सिलेंडरवर फोटो छापून स्वत:चं मार्केटिंग

Gujarat corona pandemic

गांधीनगर, २१ एप्रिल: संपूर्ण देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. तर रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजरातमध्ये देखील तीच परिस्थती असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आरोग्य परिस्थिती गंभीर असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांना गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमधील एका नेत्याने यामध्ये देखील स्वतःच्या मार्केटिंगचा फंडा शोधला आहे.

गुजरातमध्ये एका भाजप नेत्याने ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक या प्रकाराचा निषेध करत आहेत. अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सवालं कोविड सेंटर उभारलं. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात.

प्राप्त माहितीनुसार, हिरा सोलंकी यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या लोकप्रियतेसाठी ऑक्सिजन सिलेंडरवर त्यांचे पोस्टर्स छापले आहेत. भाजपा नेत्याच्या अशा कृत्यावर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोविड सेंटर उभारून भाजपा नेत्याने चांगले काम केले परंतु ऑक्सिजन सिलेंडरवर फोटो छापून स्वत:चं प्रमोशन करणं म्हणजे संकटात संधीसाधूपणा करणं आहे ते नेत्यांना शोभत नाही असं लोकं म्हणत आहेत.

 

News English Summary: Supporters of Hira Solanki have printed their posters on oxygen cylinders for the popularity of their leader. People are expressing anger over such an act of the BJP leader. The BJP leader did a good job by setting up the Covid Center, but people are saying that promoting oneself by printing photos on oxygen cylinders is an opportunity in a crisis and it does not suit the leaders.

News English Title: Gujarat corona pandemic BJP leader Hira Solanki photos over oxygen cylinder for marketing news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x