2 May 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

इथे माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? | भाजप प्रवक्त्याने मोदी-शहांना झापलं

BJP spokesperson Ritu Rawat

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते. देशातील इस्पितळांमध्ये आणि इस्पितळांबाहेर, स्मशान भूमी बाहेर असं सर्वत्र रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल झाल्याचं चित्रं आहे.

दरम्यान, कोरोनाची झालेली स्फोट स्थिती आता वेगवेगळ्या पक्षातही मतभेद निर्माण करताना दिसते आहे. कोरोनाचा स्फोट झालेला असताना मोदी-शाह बंगालमध्ये मोठमोठ्या गर्दीच्या सभा घेतायत, त्यावर आज भाजपच्या प्रवक्त्यानेच जोरदार टीका केली.

हिंदी वृत्त वाहिनीवरील चर्चेत त्यांनी मोदी शहा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं पाहायला मिळालं. या चॅनलवर कोरोना आणि ऑक्सिजनच्या स्थितीवर चर्चासत्र आयोजीत करण्यात आलं होतं. त्यात भाजपच्या प्रवक्त्या रितू रावत सहभागी झाल्या होत्या. त्याच चर्चासत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजप सरकारवरच टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या की, ऑक्सिजनचा दुष्काळ आहे, औषधांच्या किंमती वाढवल्यात. एवढच नाही तर लोक मरतायत, तुम्हीच सांगत होतात की, अंतर ठेवा मग तुम्हीच ते का नाही पाळलं, का निवडणुका घेतल्या? जर ह्या पृथ्वीवर माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? सरकारही बनणार, निवडणुकाही होणार तर त्याची एक वेळ असली पाहिजे ना? माझ्या ह्या भूमिकेवरुन जर भाजपनं मला काढून टाकलं तर टाकू द्या, मला ह्याचा त्रास होतोय, मी लोकांची वेदना वाटू शकते.

 

News English Summary: Corona’s explosive state of affairs now appears to be creating divisions even among different parties. Modi-Shah holding mass rallies in Bengal when corona blasts, a BJP spokesperson Ritu Rawat today slammed.

News English Title: BJP spokesperson Ritu Rawat criticized PM Narendra Modi and Amit Shah over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x