3 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

Health First | सतत होणाऱ्या डोकेदुखीवर आहेत काही घरगुती उपाय । नक्की वाचा

home remedies for headache

मुंबई २४ एप्रिल : डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी डोकं दुखण्याची तक्रार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जगातील ५० टक्के लोकांचे वर्षभरात एकदा का होईना डोकं दुखतंच, असं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्वेक्षण सांगतं. कुठल्याही वंशाच्या, कोणत्याही वयाच्या, स्त्री किंवा पुरुषांमध्ये ही लक्षणं आढळतात. डोकं जड होणं, किंचितसं दुखणं, इथपासून ते जोरदार ठणकणं, मस्तक शूळ उठणं किंवा भिंतीवर आपटावसं वाटण्यापर्यंत त्याच्या अनेक छटा असतात. कधी ते काही क्षण दुखतं, कधी काही मिनिटं किंवा काही तास दुखतं, तर क्वचित प्रसंगी ते दिवसेंदिवस दुखत राहतं. कधी ते एका बाजूला दुखतं, कधी फक्त कपाळ नाहीतर डोक्याची मागची बाजू तर कधी संपूर्ण डोकं गिरमिट फिरवल्यासारखं दुखू शकतं. कित्येकदा त्याचं कारण कळतसुद्धा नाही. पण असंख्य प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींचे ते लक्षण असू शकतं.

पेनकिलर घेतल्याने डोकेदुखी थांबते पण असा गोष्टी सतत केल्याने म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गोळ्या घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी खाली दिलेले आयुर्वेदीक उपाय वापरा.

सुंठाची पेस्ट
सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.

दालचिनी पेस्ट
हिवाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.

अॅक्युप्रेशरही आहे फायदेशीर
आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. यामुळे एकाच मिनिटात डोकेदुखी कमी होईल.

News English Summary: The number of patients who come to the doctor with headache is higher. According to a World Health Organization survey, 50 percent of the world’s population suffers from headaches at least once a year. These symptoms are found in men and women of any race, any age. Taking painkillers stops the headaches but taking such pills without consulting a doctor has adverse effects on health. Use the following Ayurvedic remedies for this.

News English Title: Home remedies for headache news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x