11 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं – संजय राऊत

Corona virus, Lockdown, MP Sanjay Raut, PM Narendra Modi

मुंबई, १३ मे: सध्या देशावर करोनाचं संकट असून टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली.

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या परिस्थितीत अशा प्रकारच्या पॅकेजची देशाला खूप गरज होती, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच कोरोनाचं मोठं संकट असताना पंतप्रधानांवर टीका होणं योग्य नाही. या परिस्थितीत संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचवला आहे. ‘देशातील सर्व देवस्थानांच्या ट्रस्टकडं पडून असलेलं सोनं केंद्र सरकारनं कर्जरूपानं ताबडतोब ताब्यात घ्यावं,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The country is currently in a crisis of corona and it is not appropriate to criticize. Shiv Sena MP Sanjay Raut has expressed the view that the entire country needs to stand behind the Prime Minister. Sanjay Raut has welcomed the decision of Narendra Modi to announce a package of Rs 20 lakh crore. Sanjay Raut has said that the country needed such a big package.

News English Title: Corona virus Lockdown Shivsena MP Sanjay Raut Appeal To Support PM Narendra Modi News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x