सध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर

पुणे ०३ एप्रिल | आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”.
छगन भुजबळांचा पुतण्या माझ्याकडे सोडवण्याची विनवणी करत होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा पुतण्या म्हणजे समीर भुजबळला माझ्या दोन महिने आधी जेलमध्ये टाकलं होते. मग तो कधी जाईल यांच्याकडे? मुलाचं बोलाल तर तो लांबच होता. त्यामुळे कोण पुतण्या आणि कशासाठी काढला हे माहिती नाही,” असं भुजबळांनी म्हटलं आहे.
माझ्या केसेस कोर्टात असताना ते महागात पडेल असं म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ समजायचा. ईडी, सीबीआय यांना जसं हातातील शस्त्र म्हणून वापरत आहेत तसं आता न्यायपालिकाही हातात आहे असं सुचवायचं आहे का?,” अशी विचारणा भुजबळांनी केली.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर व्हीडिओ शेअर करुन चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे आहे. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.
मधील प्रकरणे अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होणार आहे.
साधी आपली ग्रामपंचायत सुद्धा ज्यांना आपल्या ताब्यात ठेवता 2/3— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021
News English Summary: Many scams like Jalayukta Shivar, Chikki scam, Mumbai Bank scam to PWD are pending investigation. But in the current situation, the issue of people’s health is our main issue. So we are calm. Rupali Chakankar warned that once we get out of this vicious cycle, all inquiries will be done.
News English Title: NCP Leader Rupali Chakankar reply to Chandrakant Patil over his threat to minister Chhagan Bhujbal news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE