2 May 2024 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी

BJP MP Subramaniam Swamy

नवी दिल्ली, ०६ मे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.

ही दुसरी वेळ आहे, जेव्हा देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यापूर्वी, 30 एप्रिलला 4 लाख 2 हजार 14 रुग्णांची नोंद झाली होती आणि 3525 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ठीक झालेल्या रुग्णांचा आकडाही कालपेक्षा कमी आहे. मंगळवारी देशात 3.37 लाख रुग्ण ठीक झाले होते, तर आज 3.24 लाख रुग्ण ठीक झाले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्यानं होत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भारतात लहान मुलांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. मोठ्या संख्येने लहान मुलं संक्रमित होत आहेत. प्रत्येक दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या होत आहे. त्यातच लहान मुलांमध्ये कोरोना पसरत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळेच कोरोना काळात आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांमधील कोरोना प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने 2 डॉक्युमेंट जारी केले आहेत. एक म्हणजे मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याबाबतच्या नव्या गाइडलाइन्स आणि पीडिएट्रिक एज ग्रुप म्हणजे लहान मुलांच्या उपचारासंबंधी प्रोटोकॉल यांचा त्यात समावेश आहे. त्यानंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याच विषयाला अनुसरून सरकारला सतर्कतेचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या दाव्यावर कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण पाहता स्वामींचा दावा गंभीरतेने घेण्याची गरज आहे.

मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. यामुळे कोणत्याही हवाल्याशिवाय स्वामींनी ही गोष्ट सांगणे म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारखे आहे. आधीच लोक दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे भीतीच्या छायेखाली आहेत. स्वामींच्या या दाव्याच्या काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने हिवाळ्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता जाहीर केली. मात्र, या लाटेत कोण कोण प्रभावित होतील हे सांगितले नाही.

हे सुद्धा वाचा;

 

News English Summary: Subramaniam Swamy has over one crore followers on Twitter. Swamy did not cite any study on Corona’s third wave claim. However, Swami’s claim needs to be taken seriously given the corona infection of children in the second wave.

News English Title: Children will impact in third wave of corona said BJP MP Subramaniam Swamy news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x