4 May 2025 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप

MLA Bhai Jagtap

मुंबई, २४ मे | महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.

भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. ‘केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधलीय. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही ? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असंही भाई जगताप म्हणाले आहेत.

केंद्राकडून राज्याला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. कालपर्यंत आम्ही रक्ताचे 7 हजार युनिटस रक्तादानाद्वारे जमवले आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने ढकलण्याचे काम केले आहे. 93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?’ असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has lost his mental balance. Those who cut down the Aarey trees in the dark of night are going to Konkan and expressing their concern for the trees. Mumbai city president Bhai Jagtap has criticized Congress in such words said Mumbai congress president MLA Bhai Jagtap.

News English Title: Mumbai congress president MLA Bhai Jagtap criticized Devendra Fanavis over Konkan tour news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या