3 May 2025 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPL 2021 | आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने यूएईत होणार - BCCI

VIVO IPL 2021

मुंबई, २९ मे | कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत (IPL 2021 UAE) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.

बोर्डाने म्हटले आहे की, यासाठी फक्त सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोचा विचार करण्यात आला आहे. यूएईमध्ये अबूधाबी, शारजाह आणि दुबईच्या मैदानावर सामने होतील. येत्या काही दिवसात BCCI परदेशी खेळाडूंबद्दल परदेशी बोर्डाशीही बोलणार असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. इंग्लिश बोर्डाने यापूर्वीच खेळाडूंवर निर्बंध घातले आहेत.

टी-20 विश्वचषक संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची 1 जून रोजी बैठक होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी बैठकीत बीसीसीआय जूनपर्यंत वेळ मागेल. विश्वचषक संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बोर्ड भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेईल.

 

News English Summary: The Board of Control for Cricket in India (BCCI) has taken a major decision regarding the Indian Premier League (IPL 2021 UAE) which has been postponed due to corona. The rest of the IPL matches will now be played in the United Arab Emirates (UAE). BCCI vice-president Rajiv Shukla informed about this.

News English Title: BCCI to conduct remaining matches of VIVO IPL 2021 in UAE news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या