3 May 2025 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Special Recipe | दूध-साखरेविना आईस्क्रीमची रेसिपी | नक्की ट्राय करा

Vegan Mango ice cream

मुंबई, 02 जुन | फळांचा राजा आंबा म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण. उन्हाळ्यात या आंब्याचं आईस्क्रीम पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल. तुम्ही वेगन पलेओ डाएट करत असाल, तरीही तुम्ही हा आंब्याचा थंडावा अनुभवू शकता. कसा? आमच्याकडे आहे एक चविष्ट उपाय. आंब्याचं पलेओ आईस्क्रीम. यात दुधाचा थेंबही नाही की साखरही नाही.

तर पलेओ डाएट म्हणजे आदिमानव खायचा ते अन्न शेतीचा शोध लागण्याआधी आदिमानव झाडावरची फळं, कंदमुळं, मांस या अन्नावर जगायचा. सध्या जे पलेओ वेगन डाएट केलं जातं ते म्हणजे जास्तीतजास्त भाज्या आणि फळं खायची. यातून दूध, दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्रक्रिया केलेलं अन्न पूर्णपणे वर्ज्य असतं.

थंडगार केळी मिक्सरमध्ये जाडसर मिश्रण होईल अशी वाटून घ्यायची. यामध्ये केळी दुधाचं काम करतात. त्यानंतर त्यात आंब्याच्या फोडी बारीक करून केलेलं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. त्यावर बदामाचे काप टाकून थंडगार सर्व्ह करायचं. ना साखर ना बर्फ. कारण केळी थंडगारच घ्यायची आणि आंबे गोड असतातच, मग साखरेची गरज काय?

त्यामुळे वेगन डाएट करणाऱ्यांनीच नव्हे, तर सर्वांनीच या उन्हाळ्यात ही थंडगार ट्रीट चाखून पाहाच.

महत्वाची टीप: आपल्या वाचकांसाठी नवनव्या आणि चविष्ट अशा रेसिपी आणत असतो. पण या रेसिपी देताना त्या अधिक महागड्या तसेच झटपट आणि खास कशा होतील याची काळजी घेतली जाते. अगदी जे पदार्थ आपण महागड्या हॉटेलमध्ये पाहतो ते स्वस्तात घरच्या घरी बनवून आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतो. त्यामुळे पसंत आल्या तर घरी नक्कीच ट्रे करा आणि आपल्या मित्र मंडळींसोबत देखील शेअर करा.

 

News English Summary: Mango, the king of fruits, is the lifeblood of all. When you see this mango ice cream in summer, your mouth will water easily. Even if you are on a vegan paleo diet, you can still feel the coolness of this mango. How so We have a delicious solution. Mango Paleo Ice Cream. It has no drop of milk or sugar.

News English Title: Vegan Mango ice cream special recipe no milk no sugar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Recipe(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या