5 May 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

प. बंगाल | भाजपमधील अंतर्गत वाद पेटला, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोंधळ

West Bengal assembly election 2021

कोलकत्ता, ०५ जून | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी ते कार्यकर्ते सर्वच असंतुष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात निदर्शने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. परंतु, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.

 

News English Summary: After the results of the West Bengal Assembly elections, the BJP’s problems are increasing day by day. MLAs, MPs, office bearers and activists are all dissatisfied. Also, with the rise of Mamata Banerjee’s political weight in the run-up to the 2024 Lok Sabha elections, unrest has spread in the BJP.

News English Title: West Bengal BJP President Dilip Ghosh faced protest of party workers news updates.

हॅशटॅग्स

#WestBengalAssemblyElection2021(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x