29 March 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्राकडून तारीख पे तारीख | संयुक्त राष्ट्राकडूनही आंदोलनाचं समर्थन

Farm Bills, protest farmer, Modi government, meeting

नवी दिल्ली, ५ डिसेंबर : मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. कॅनडा आणि ब्रिटनमधून मिळालेल्या प्रतिसादानंतर थेट संयुक्त राष्ट्रातून देखील या आंदोलनाचं समर्थन करण्यात आलं आहे. “लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असून अधिकाऱ्यांनी त्यांना ते करु द्यावं,” अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अँटोनिओ गुटेरस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे.

संयुक्त राष्ट्रांचे आणखी एक सरचिटणीस स्टिफन डुजारिक यांना शुक्रवारी एका पत्रकारानं भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही लोकांना स्वतःसाठी आवाज उठवताना पाहू इच्छितो. मी आपल्याला हेच सांगेन जे मी दुसऱ्यांशी या मुद्द्यावर बोललो आहे. लोकांना शांततापूर्ण पद्धतीने निषेध आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तसं करु द्यायला हवं.”

 

News English Summary: For the past few days, farmers from Punjab and Haryana have been protesting on the Delhi border against the central government’s new agriculture law. The farmers are demanding repeal of three agriculture laws introduced by the central government in Parliament. Against this backdrop, a meeting of the Modi government and organizations was held on Saturday to find a solution. However, the meeting has not yet fully resolved the farmers’ demands and the next discussion will be on December 9.

News English Title: Farm Bills protest farmer Modi government meeting be held next 9 December News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x