4 May 2025 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update

मुंबई, ०७ जून | केरळ मधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.

मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस झाला. गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाचा दिलासा मिळाला आहे. ठाणे, नवी मुंबईतही चांगला पाऊस झाला. तर नाशिकच्या चांदवड तालुक्यात ढगफुटी झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस जोरदार पाऊस झाला. मात्र, आता पाऊस थांबला आहे. दरम्यान, नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. सकाळीदेखील पावसाची रिपरिप सुरू असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.

दरम्यान, राज्यात राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.केरळमध्ये नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने म्हणजे ३ जूनला मोसमी पावसाने प्रवेश केला. त्यामुळे पाऊस ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र पोषक स्थितीमुळे अवघ्या दोन दिवसांच्या विक्रमी वेळेत पाऊस ५ जूनला केरळमधून महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच दिवशी त्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सहा जिल्हे व्यापले. दुसऱ्या दिवशी ६ जूनलाही पावसाने वेगाने प्रगती केली असून, रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग आणि पुणे जिल्ह्य़ातही प्रवेश करून तो पुणे शहरापर्यंत दाखल झाला. पावसाने रविवारी मराठवाडय़ापर्यंत मजल मारली. पाऊस उस्मानाबादला पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

 

News English Summary: The monsoon rains in Maharashtra, which arrived in Maharashtra in just two days from Kerala, have continued to cover 30 per cent of the state in two days. After some parts of Konkan and Central Maharashtra, it has now entered Marathwada.

News English Title: Monsoon rains have cover 30 per cent of the state in two days news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या