फडणवीसांना जमलं नाही ते आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं | मुंबई आरे'तील ८१२ एकर जागा वन विभागाकडे | जंगल कायम राहणार

मुंबई, ०८ जून | मुंबईसारख्या महानगरात आता मध्यभागी जंगल उभं राहणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे ची ८१२ एकरची जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार २८६ हेक्टर अधिसुचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. त्यामुळे आरे मधली ही जमिन आता अधिकृतरित्या Indian Forest Act च्या सुरक्षेत आली आहे.
आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जमिनीचा ताबा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे सोपवला. या जमिनीचा ताबा मिळाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात मध्यभागात जंगल निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील जागेत मेट्रो कारशेड बांधण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या काळात दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. यासंदर्भातील राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार असून त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेत असताना आदिवासी समाजाचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आरे – १२५.४२२ हे., गोरेगाव- ७१.६३१ हे. आणि मरोळ मरोशी-८९.६७९ हे. जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने ८१२ एकर जागेवर आता वन विभाग जंगल फुलवू शकते.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2021
आरेमधील जागेव्यतिरीक्त बोरिवली, गोरेगाव, मरोळ-मरोशी येथील जमिनीचा ताबाही वनविभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनीवर मुंबईत भविष्यकाळात जंगल फुलवलं जाऊ शकतं.
यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
News English Summary: In a metropolis like Mumbai, the forest will now stand in the middle. Aarey’s 812 acres of land near Sanjay Gandhi National Park has been declared a forest. Accordingly, 286 hectares of notified land has been handed over to the Forest Department by Aarey Dairy Colony. Therefore, the land in Aarey is now officially protected by the Indian Forest Act.
News English Title: Mumbai Aarey handed over 286 hectare land of to Forest Department CMO uddhav thackeray tweeted news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL