2 May 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

बारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा

PM Narendra Modi

बारामती, ०९ जून | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची सध्या खूप चर्चा होत आहे. त्यांच्या दाढीच्या स्टाइलची लोक नोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांच्यासोबत तुलना करत आहेत. पण काही लोक असेही आहेत, ज्यांना पंतप्रधानांच्या दाढीची स्टाइल आवडलेली नाही.

यामधून एक बारामतीचा चहावाला देखील आहे. त्याने पंतप्रधानांच्या दाढीवर आक्षेप घेत त्यांना दाढी कट करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर चहावाल्याने पंतप्रधानांच्या नावावर 100 रुपयांचे मनीआर्डरही केले आहे. अनिल मोरे हे बारामतीच्या इंदापूर रोडवर एका खासगी रुग्णालयासमोर ‘टी हाउस’ नावाने चहाची टपरी चालवतात. पंतप्रधान मोदींच्या दाढीवर लक्ष केंद्रीत करत मोरे यांनी बुधवारी म्हटले की, ‘देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. देशात लोक मरत आहेत आणि त्यांचे रोजगार जात आहेत, मात्र पंतप्रधान मोदी आपली दाढी वाढवत आहेत. जर त्यांना काही वाढवायचे असेल तर त्यांनी लोकांसाठी रोजगार वाढवले पाहिजे.’

पंतप्रधान मोदींनी दाढीऐवजी लसीकरण वाढवले पाहिजे:
अनिल मोरे पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींनी लोकांसाठी आरोग्य सुविधांसह लसीकरणामध्ये वेग आणायला हवा. अनिल मोरे पुढे म्हणाले की, लोकांच्या समस्यांचे समाधान होईल या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पद देशातील सर्वात मोठे पद आहे. मी माझ्या कमाईमधून 100 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाढी करण्यासाठी पाठवत आहे.’

अनिल मोरे पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे देशाचे महान नेते आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांना दुखावणे आमचा हेतू नाही. मात्र ज्या प्रकारे कोरोना महामारीमुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत, त्यामुळे लोकांसाठी रोजगार वाढवले पाहिजे.’ या मागण्यांकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. अनिल मोदींनी मनीऑर्डरसोबत पत्र पाठवून कोरोना काळात मरण पावणाऱ्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. यासोबतच पुढचे लॉकडाऊन लागू झाले तर एका कुटुंबासाठी 30,000 रुपये देण्याची मागणीही केली आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi’s beard is currently the talk of the town. People are comparing his beard style with that of Nobel laureate Ravindra Nath Tagore. But there are some people who don’t like the Prime Minister’s beard style. One of them is Baramati tea. He has objected to the Prime Minister’s beard and demanded that he cut it. Not only that, Chahavala has also placed a money order of Rs 100 in the name of the Prime Minister.

News English Title: Narendra Modi beard style Baramati Chaiwala Anil sent 100 rupees to Prime Minister Narendra Modi and appeals to beard news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या