4 May 2025 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

खुशखबर | ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा | योजनेबद्दलची माहिती वाचा

Learning license at home

मुंबई, १४ जून | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे.

तुम्हाला लर्निंग लायसन्सची सुविधा आता घरबसल्या मिळणार आहे. आजच या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलीय. त्यामुळे आता लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करुन, तपशील देऊन तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवता येणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता:
या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीदेखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

घर बसल्या रिन्यू करा वाहन परवाना:
कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे लोकांची अनेक कामं लांबणीवर पडली. पण आता सगळं काही पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे आता महत्त्वाची ऑफिसं आणि व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. अशात जर तुम्हाला वाहन परवाना (Driving License) रिन्यू करायचा असेल तर तोदेखील आता सोप्या पद्धतीने करता येणार आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.

कोरोनाचा धोका आणि वाढती लोकांची गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म डाऊनलोड करुन भरावा लागेल आणि मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. इतकंच नाही तर जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए आवश्यक असणार आहे. यामध्ये जुनं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोदेखील अपलोड करावा लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Launching service to get learning license at home Announcement by minister Anil Parab news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या