4 May 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER
x

मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय

Morning Consult Rating

वॉशिंग्टन, १८ जून | कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.

या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवलं आहे. जून महिन्यात मोदींचं गुणांकन ६३ टक्के इतकं होतं. मात्र यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकलं असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

मॉर्निंग कंसल्ट नियमितपणे जगातील नेत्यांच्या रेटिंगला ट्रॅक करते. पंतप्रधान मोदींनंतर दुसरे स्थान इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी (६५ टक्के) यांनी मिळवले आहे. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मेनुअल लोपेझ ओब्राडोर (६३ टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (५४), जर्मन चांसलर अंजेला मार्केल (५३ टक्के), अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (५३ टक्के), कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो (४८ टक्के) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (४४ टक्के) यांनी स्थान मिळवले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Global Leader Approval Tracker Morning Consult Prime Minister Narendra Modi Approval Rating Fell 20 Points news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या