मुंबई : मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी नुकताच वक्फ बोर्डाचे राज्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी वक्फ बोर्ड संदर्भात पत्र व्यवहार केला. वक्फ बोर्ड कडून राज्यसरकारच्या मराठी भाषेत माहिती लोकांना देण्याबाबतच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती यात मांडण्यात आली आहे.
प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत इरफान शेख म्हणाले की, वक्फ बोर्डाचे बहुतेक लाभार्थीं मराठी आहेत आणि मराठी भाषा समजतात, त्यामुळे संकेतस्थळावर फक्त इंग्रजीत सर्व माहिती प्रसिद्ध करून उपयोग नाही. हा प्रकार राज्यसरकारच्या मराठी प्रथम धोरणाच्या देखील विरोधात आहे. मागील वर्षात शासनाने जरी केलेल्या अधिसूचना नुसार सर्व सरकारी आस्थापना आणि कार्यालयांना व्यवहार मराठीत करण्याचा आदेश आहे. तरी देखील वक्फ बोर्ड या आदेशाचे पालन करत नाही, अशी भूमिका इरफान शेख यांनी मांडले.
दरम्यान ते भूमिका स्पष्ट करताना पुढे म्हणाले की, मुंबईचे उदाहरण समोर ठेवले तर शहरात बऱ्यापैकी लोक मुसलमान आहेत. शहराच्या अनेक भागात स्थलांतरित कामगार व वेगवेगळ्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या पाहिली तर नमाज पढण्यासाठी मशीदी कमी पडतात. दुर्दैवाने अनेक लोकांना रस्त्यावर प्रार्थना करायची वेळ येते. सरकार नवीन मशीदी बांधायला परवानगी देत नाही. फक्त मदरसांना परवानगी मिळते. वक्फ बोर्ड कडे सध्या अनेक जमिनी आहेत. बोर्ड त्यावर काय करत आहे, बोर्डचे आर्थिक व्यवहार काय आहेत, ही सर्व माहिती लोकांसाठी मराठी मध्ये उपलब्ध झाली पाहिजे, म्हणजे लोकांना पण बोर्ड काय काय कामे करत आहे याची जाणीव राहील, असे शेख म्हणाले.
काय म्हटलं आहे इरफान शेख यांनी विनोद तावडे यांना दिलेल्या पात्रात;
