3 May 2025 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक | मोदींना जोरदार टोला

Gautam Adani

लखनऊ, २९ जून | मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं पाहायला मिळालंय. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाला आता तब्बल ७ महिने उलटले आहेत.

मागील ७ महिन्यांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक झाल्याची अफवाही पसरली होती. परंतु, नंतर टिकैत यांना अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दुसऱ्या बाजूला शेतकरी आंदोलनातील काही निवडक नेत्यांच्या दाव्यानुसार राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचा आरोप केला जातो. यावरुनच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून पोलखोल करत जोरदार हल्लाबोल केला आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसल्याचं दिसत आहे. मोदींसोबतच उद्योगपती गौतम अदानीसुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिंह यांनी “टिकैत शेतकऱ्यांचं हित जपणारे नेते नाहीत, अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत” असा सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Samajwadi Party leader I P Singh slams PM Narendra Modi said not Rakesh Tikait man in Gautam Adani airplane is farmer supporter news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या