4 May 2025 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

फडणवीसांचं दत्तक नाशिक | स्मार्ट सिटीच्या विकासाला नाशिककर कंटाळले | स्थानिकांची बॅनरबाजी

BJP Nashik smart city

नाशिक, ०२ जुलै | आपलं शहर स्मार्ट असावं, अशी प्रत्येक शहवासीयांची अपेक्षा असते. परंतु चुकीच्या आणि रेंगाळलेल्या कामांमुळे वैताग आल्यावर हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांना करावी लागते. काहीशी अशीच परिस्थिती नाशिकमधील मुख्य रस्त्यांची झाली आहे. दहीपूल बाजारपेठेतील रस्ते खोदून त्याची उंची काम केली आहे. यामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि रहिवाश्यांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. यामुळे स्थनिक नागरिकांनी काम थांबवण्याची मागणी करणारा फलकच लावला आहे. मुख्य रस्त्यावर असलेला पिंपळपार चौकात स्मार्ट सिटीचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हे काम त्वरित थांबवण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. त्यासाठी फलकाचा आधार घेतला आहे.

फलकावर नेमकं काय लिहिलंय?
स्मार्ट सिटीच्या नावाखाली चुकीचे गैरसोयीची व त्रासदायक रस्त्यांचे काम त्वरित थांबवावे, तसेच आहे तसा रस्ता पुर्ववत करावा. फक्त पावसाचे पाणी साचणार नाही अशी ड्रेनजची व्यवस्था करावी, ही रहिवाशी, व्यापारी व नागरिकांची कळकळीची विनंती आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून नाशिकमध्ये ४ वर्षांपासून स्मार्ट सिटी कंपनीची कामे सुरू आहेत. एकूण ५२ पैकी जेमतेम पाच ते सात प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कामांवर नागरिक, व्यापारी वर्गाकडून टीक होत आहे. लॉकडाऊननंतर दुकाने काही तासांसाठी उघडली असतांना रस्ते खोदून ठेवल्यामुळे ग्राहक दुकानांपर्यंत येऊ शकत नाही, वाहतूक ठप्प होत असते, असे अनेक प्रकार घडत आहे. मेनरोड परिसरात स्मार्टसिटीच्या अंतर्गत कामांची लगबग सुरु आहे. याठिकाणी मोठमोठे नाले खोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. अगदी अरुंद जागेतून प्रवास करून नागरिकांना खरेदी करावी लागते आहे. अशा परिस्थितीतही अनेकजण चारचाकी आणि दुचाकी वाहनांची नाहक गर्दी करतात. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना तर त्रास होतोच शिवाय वाहतूक कोंडीलादेखील सामोरे जावे लागते आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Nashik smart city work citizen demand to stop this work news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या