13 May 2024 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

मुंडे भगिनींचे राजकारण अजून खडतर | नाराजी नाट्याच्या प्रश्नावर उत्तरावेळी फडवणीस संतापले

Devendra Fadnavis

नाशिक, ०८ जुलै | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश नसल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितले? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस आज नाशकात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंडे भगिनींविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले की, ‘कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेत्यांकडून घेतले जात असतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची विनाकारण बदनामी करू नका असे फडणवीस म्हणाले.

पंकजा मुडेंनी ट्विट करत केले होते वृत्तांचे खंडन:
दरम्यान काल मंत्र्यांची यादी जाहीर होईपर्यंत प्रीतम मुंडेंच्या नावाची चर्चा होती. यानंतर पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे ट्विट करत खंडन केले होते. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. ‘खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadnavis reaction over Pritam Munde not get opportunity in cabinet reshuffle news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x