2 May 2025 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

तुमच्या रेशन कार्डमध्ये घरबसल्या ऑनलाईन मोबाईल नंबर, पत्ता असा अपडेट करा - वाचा स्टेप्स

Update Mobile number and address on ration card online

मुंबई, १२ जुलै | केंद्र सरकारने कोरोना वायरस लॉकडाऊनच्या काळात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना लागू करत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान सरकारच्या योजनांचा लाभ उठवण्यासाठी लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर रेशन कार्ड सोबत लिंक असणं आवश्यक आहे. तसेच काही सुविधांसाठी आधारकार्ड देखील लिंक करणं बंधनकारक आहे. मग जर तुम्हाला रेशन दुकानातून माफक दरात धान्य आणि सरकारच्या इतर योजनांचा फायदा हवा असेल तर आजच तुमच्या घरातील सदस्यांचे डिटेल्स अपडेट केलेत का? हे तपासा आणि जर सदस्य नोंदणी राहिली असेल तर ती घरबसल्या करून घेण्याची देखील सोय आहे. मग पहा नेमके हे बदल कसे कराल?

* सर्वात आधी भारत सरकारच्या www.pdsportal.nic.in या लिंकवर जा.
* यानंतर राज्यांची नावे असलेल्या टॅबवर क्लिक करा.
* यानंतर नवीन टॅबवर राज्यांची यादी येईल.
* तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याची निवड करा.
* यानंतर नवीन पेज ओपन होईल.

त्यानंतर घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये जी माहिती भरायची आहे ती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर याची एक प्रिंट तुमच्याकडे बाळगा.

याच पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक देखील अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर Update Your Registered Mobile Number हा पर्याय दिसेल. यात तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटी जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाकायचा आहे. हा क्रमांक टाकून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to update Mobile number and address on ration card online in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या