पवारांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या वृत्तावर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण | काय म्हटलं?

मुंबई, १५ जुलै | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत असल्याची कालपासून राज्यभर, देशभर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कालपासून माध्यमातून पवारसाहेब राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत असून त्याबाबत आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बातम्या चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी आज (बुधवारी) स्पष्ट केलं. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल हे सर्वांनाच माहिती आहे. कारण, समोर 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
Prashant Kishor met me twice, but we only talked about a company of his. No discussion was held regarding the leadership for the 2024 elections or the Presidential election. Prashant Kishor told me that he has left the field of formulating poll strategies: NCP chief Sharad Pawar
— ANI (@ANI) July 14, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP party gave clarification on Presidential election and Sharad Pawar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL