25 May 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 25 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
x

पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तासभर चर्चा | लोकसभा अधिवेशनापूर्वीच्या चर्चेमुळे महत्व

Sharad Pawar

नवी दिल्ली, १७ जुलै | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधानांच्या भेटीची आधीच वेळ मागितली होती. शिवाय बँकिंग रेग्युलेशन अॅक्टबद्दल ऑगस्ट महिन्यात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. नागरी सहकारी बँकांवर गदा आणली जाईल, आरबीआयकडून अंकूश येऊन महत्त्व कमी होईल, असं पवारांचं म्हणणं आहे.

शिवाय नवं सहकार खातं अमित शाहांकडे आहे. त्यामुळे सहकारसमोरील आव्हानं काय, साखर कारखाने, दूध संस्था यांच्यासमोरील प्रश्नांबाबत चर्चा असू शकते. याशिवाय सध्या शेतकरी आंदोलन 8 महिने सुरु आहे. आजच्या बैठकीत यावरही चर्चा झालेली असू शकते. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील असं पवारांनी कधीही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे सध्या तशी शक्यता नसल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP President Sharad Pawar meet PM Narendra Modi at PMO office news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x