2 May 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

VIDEO | करीना कपूरच्या विवादित 'प्रेग्नेंसी बायबल’ संदर्भात कायदेतज्ज्ञ काय सांगतात?

Kareena Kapoor book pregnancy bible

मुंबई, १७ जुलै | बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करीनाने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच नावं ‘प्रेग्नेंसी बायबल’ असे आहे. करीना या पुस्तकाच्या नावामुळे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करायची गरजं नाही हे करीनाने पुस्तकात सांगितलं आहे.

दरम्यान, करिनावर काही लोक प्रचंड संतापले आहेत. इतकेच नाही तर तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशार त्यांनी दिला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डने करिनाच्या या पुस्तकाच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. करिनाने लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव आहे, ‘करिना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल.’ करिनाच्या या पुस्तकाविरोधात ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी सांगितले आहे.

मुंबईतही दाखल होऊ शकते तक्रार:
दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, आमच्याकडे याबाबत तक्रार आली आहे. मात्र एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. कारण ही घटना इथली (बीड) नाही. त्यामुळे आम्ही शिंदे यांना मुंबईमध्ये जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.

करिना कपूरच्या पुस्तकाला विरोध:
ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाची कानपूरमधील चुन्नीगंज येथे बैठक झाली. या बैठकीत अनेक नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी करिना कपूरने लिहिलेल्या या पुस्तकाच्या नावामध्ये बायबल हा उल्लेख केल्याबद्दल एकमताने निषेध करण्यात आला. तसेच तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अर्थात त्याआधी तिच्याविरोधात कोणत्या कायद्याअंतर्गंत कारवाई करता येईल याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी निर्माण झालेल्या वादाबाबत करिनाने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

करीना कपूरच्या विवादित ‘प्रेग्नेंसी बायबल’ संदर्भात कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट प्रिसिला सॅम्युअल काय सांगतात?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kareena Kapoor book pregnancy bible lands in trouble Christian group files police complaint news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या