पेगासस स्पायवेअर | मोदी सरकारने आरोप फेटाळले | पण फ्रान्समध्ये सरकारकडून प्रकरणाची चौकशी सुरू

नवी दिल्ली, २१ जुलै | नागरिकांवर पाळत ठेवल्याच्या जगातील सर्वात मोठ्या प्रकरणाच्या गाैप्यस्फोटानंतर आता अनेक देशांत धुरळा उठला आहे. सोमवारी स्पायवेअर पेगाससच्या संभाव्य नावांत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा तसेच अश्विनी वैष्णव व प्रल्हाद पटेल या केंद्रीय मंत्र्यांची नावे समोर आल्यानंतर मंगळवारीही संसदेत गदारोळ सुरूच राहिला. लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. काँग्रेससह अनेक पक्षांनी या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) स्थापनेची मागणी केली. राज्यसभेतही या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला.
दुसरीकडे, फ्रान्समध्ये सरकारी संस्थेने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मोरक्कोने फ्रान्सच्या पत्रकार व न्यायाधीशांवर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. यूरो न्यूजने फ्रेंच कायदे मंत्रालयाच्या हवाल्याने चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला. फ्रान्स हा अधिकृत तपास सुरू करणारा पहिला देश आहे. युरोपियन युनियनच्या खासदारांनीही या निषेध करत ज्या देशांत अशा प्रकारची पाळत ठेवली असेल त्यांनीही तत्काळ चौकशी सुरू करावी, असे म्हटले.
दरम्यान, देशात हेरगिरीच्या निशाण्यावर असलेल्या आणखी काही नावांचा ‘पेगासस प्रोजेक्ट’ने खुलासा केला. त्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भारती, बेला भाटिया, अंजनीकुमार, आलोक शुक्ला, दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर सरोज गिरी व जेएनयूचा माजी विद्यार्थी अनिर्बन भट्टाचार्य आणि उमर खालिदचा समावेश आहे.
NSO म्हणाली, गैरवापराची चौकशी करणार:
पेगाससची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे एनएसओचे सहसंस्थापक शालेव हूलिओ म्हणाले की, पत्रकारांवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणात कंपनीही गंभीर आहे. सॉफ्टवेअरचा गैरवापर तर झाला नाही, या मुद्द्यावर कंपनी चौकशी सुरू करणार आहे.
संयुक्त राष्ट्र म्हणाले, सर्व देशांनी हेरगिरी बंद करावी:
संयुक्त राष्ट्रात मानवी हक्क उच्चायुक्त मिशेल बॅचलेटने मंगळवारी म्हटले की, सर्व देशांनी आपल्या हेरगिरी उपकरणांचा वापर तत्काळ बंद केला पाहिजे. ती धोकादायक आहेत. आपण जसे अण्वस्त्रांकडे पाहतो, तसेच या प्रकरणाकडेही सर्व देशांनी पाहायला हवे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Pegasus project demand for JPC inquiry into espionage in country France government verification order news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL