5 May 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
x

बेजबाबदार पत्रकारिता | राज कुंद्रा प्रकरणातील आरोप उमेश कामत दुसराच | बदनामी आपल्या उमेश कामतची

Raj Kundra

मुंबई, 22 जुलै | सध्याची पत्रकारिता सुद्धा वास्तवापेक्षा गुगल भरोसे झाली आहे असं म्हणावं लागेल. त्यात कोणतीही खातरजमा न करता कोणाचाही फोटो केवळ नावात साम्य असल्याने गुगल सर्च मध्ये मिळतो आणि तोच फोटो उचलून थेट वृत्त प्रसिद्ध केली जातात. असे प्रकार हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र देशभरात गाजणाऱ्या एखाद्या किळसवाण्या प्रकरणात काहीच संबंध नसणाऱ्या व्यक्तीची नाहक बदनामी केली जाते हे अत्यंत भीषण आहे.

कारण मागील काही दिवसांपासून राज कुंद्रा चर्चेचा विषय ठरला आहे. परदेशी असलेल्या पार्टनरसोबत पोर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून हे प्रकरण चालू आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यात राज कुंद्रासह आणखीही काही लोकांची नावं आली त्यात एक नाव होतं उमेश कामत.

राज कुंद्रा प्रकरणात आरोपी असलेल्या उमेश कामतच्या नावावरून आता हिंदी वाहिन्यांनी मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो बातम्यांवेळी लावायला सुरूवात केली आहे. उमेश कामतनेच फेसबुकद्वारे ही माहिती दिली. आजतक या आघाडीच्या हिंदी वृत्त वाहिनीने राज कुंद्रा आणि त्याचा भागीदार उमेश कामत यांच्यातलं संभाषण दाखवताना मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवायला सुरूवात केली. याचा नाहक त्रास आपल्या उमेशला झाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Marathi actor Umesh Kamat photo falsely used by Hindi news channels on Raj Kundra case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या