29 April 2024 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Special Recipe | स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

spicy soya corn Frankie recipe

मुंबई, ३० जुलै | मुंबई आणि अनेक मेट्रोसिटी मधील सहज नजरेस पडणार स्ट्रीट फूड म्हणजे निरनिराळ्या फ्रँकी. फ्रँकी हे शहरी भागातील आवडतं खाद्य आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याने ते शरीरासाठी देखील फायदेशीर असतात. मात्र आता याच रेसिपी घरातही सहज बनवल्या जातात. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी घरच्याघरी कशी बनवायची ते;

संपूर्ण साहित्य:
* 1 कप भिजवलेले सोयाबीन
* 1/2 कप उकडलेले कॉर्न
* 1/4 कप चिरलेला कोबी
* 2 कांदे
* 1 टेबलस्पून तेल
* 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट
* 1/4 टीस्पून हळद
* 1/2 टीस्पून तिखट
* 1/2 टीस्पून धणे जिरे पावडर
* 1 टीस्पून आमचूर पावडर…आवडीनुसार कमी जास्त
* 1 टेबलस्पून चिली सॉस
* 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस
* 1 टीस्पून चाट मसाला
* 1/4 टीस्पून मीठ….चवीनुसार कमी जास्त
* 2-3 टेबलस्पून मेयोनीज
* 1 कप गव्हाचे पीठ/ मैदा
* चिमूटभर मीठ
* 1/4 कप पाणी…अंदाजे

संपूर्ण कृती:
१. गव्हाचे पीठ,मीठ घालून पाण्याने, जसा पो पोळ्याना आटा भिजवतो तसा भिजवून ठेवला. गव्हाच्या पिठा ऐवजी अर्धे गव्हाचे पीठ अर्धा मैदा किंवा पूर्ण मैदा घेऊ शकतो.
२. १०-१५ मिनीटे आटा झाकून ठेवला.नंतर त्याच्या पातळ पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतल्या. आवडत असल्यास बटर लावावे.
३. कढईत तेल घालून त्यात चिरलेला कांदा परतून घेतला त्यात उकळत्या पाण्यात भिजवून पिळून घेतलेले सोयाबीन घातले.
४. नंतर त्यात उकडलेले कॉर्न, आलं लसूण पेस्ट घालून छान मिक्स केले.त्यात सुके मसाले घालून परतले.नंतर त्यात चिली सॉस, उभा चिरलेला कोबी, मीठ घालून परतून घेतले.
५. तयार पोळ्या घेऊन त्याला टोमॅटो सॉस लावला,त्यावर चाट मसाला भुरभुरला,नंतर त्यात तयार सारण मधोमध घालून त्यावर उभा चिरलेला कांदा घातला. त्यावर चाट मसाला आणि मेयोनीज घातले.
६. फ्रँकी ज्याप्रमाणे दुमडून रोल करतो त्याप्रमाणे रोल करून अल्युमिनियम फॉईलने रॅप केले.
७. स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी खाण्यासाठी तयार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Spicy soya corn Frankie recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x