4 May 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell?
x

आमदारांना विकत घेऊन सरकारं पाडणारा व्यक्ती देशाला 'शॉर्टकट राजकारण' कसं वाईट ते शिकवतोय, मोदींवर टीकास्त्र

TMC Leader Sanket Gokhale

TMC Leader Sanket Gokhale | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (11 डिसेंबर) नागपूर-शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केलं. यासोबतच त्यांनी नागपूरमधील अनेकविध प्रकल्पाचे उद्घाटन केलं. तसेच काही प्रकल्पांची पायभरणी देखील केली. याच वेळी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी आम आदम पक्षाला नाव न घेता टार्गेट केली होती.

भारतात शॉर्टकट राजकारणाची विकृती पसरत चालली आहे. करदात्यांचे पैसे लुटण्याचं काम हे नेते आणि पक्ष करत आहेत. त्यामुळे कमाई आठ आणे आणि खर्च रुपया हे धोरण देशाचं अर्थकारण रसातळाला घेऊन जाईल. अशी टीका पंतप्रधान मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता केली होती.

शॉर्टकट राजकारण म्हणजे विकृती – नरेंद्र मोदी
भारताच्या राजकारणात येणाऱ्या विकृतीपासून सावधान करु इच्छितो. ही विकृती आहे ती शॉर्टकटच्या राजकारणाची. ही विकृती आहे राजकीय स्वार्थासाठी देशाच्या पैसा लुटण्याची. ही विकृती आहे. करदात्यांनी कमावलेले पैसे लुटण्याची. शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, राजकीय नेते देशाचे प्रत्येक करदात्याचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. ज्यांचा हेतू फक्त सत्तेत येण्याचं असतं. ज्यांचं लक्ष्य खोटी आश्वासनं देऊन फक्त सरकार हडपण्याचं असतं. ते कधीही देश बनवू शकत नाहीत असं मोदी म्हणाले होते.

साकेत गोखले यांची मोदींवर जोरदार टीका
दरम्यान, मोदींच्या त्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना साकेत गोखले यांनी म्हटले आहे की, “ज्या व्यक्तीचा पक्ष केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून आमदारांना विकत घेऊन /धमकावून निवडून आलेली सरकारे पाडतो तो “शॉर्टकट राजकारण” शिकवत आहे. आपला पक्ष भाजप हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे जेव्हा मोदींनी सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्याशी १००% सहमत व्हा” असं खोचकपणे साकेत गोखले यांनी ट्विट करून म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: TMC Leader Sanket Gokhale target PM Narendra Modi over shortcut Politics statement check details on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#TMC Leader Sanket Gokhale(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x