5 May 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Health First | डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा

Benefits of sleeping on left side

मुंबई, ०१ ऑगस्ट | पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कामाचा व्याप, ताण-तणाव, प्रवास या सर्वांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर होण्यास सुरुवात होते.

चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवते आपले आरोग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्‍या स्थितीत झोपणे पसंत करतात पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. पाहू या काय आहे ते फायदे:

* डाव्या कुशीवर झोपल्याने शारीरिक स्वास्थ्य खूपच चांगले राहते. डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. यामुळे आपल्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. पचनप्रक्रिया सुरळीत होते. अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते आणि शरीरही निरोगी राहतं.

* गरोदर महिलांनी डाव्या कुशीवर झोपणं खुपच चांगलं असतं. यामुळे गर्भावर वाईट परिणाम होत नाही. तसेच हात किंवा पाय सूजन्याची समस्या निर्माण होत नाही. थकवा जाणवत नाही आणि पोटाच्या संबंधीत कुठलीही समस्या जाणवत नाही.

* बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर असल्याचे मानले जाते, अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते.

* डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होतात.

* मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे शरीर निरोगी राहते.

* हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of sleeping on left side in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x