30 April 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
x

सेनेच्या १२ मंत्र्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांचा राज्याला काहीच फायदा नाही: सेना आमदार बाळू धानोरकर

नागपूर : शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.

शिवसेनेच्या १२ मंत्र्यांवर आरोप करताना धानोरकर म्हणाले की, शिवसेनेच्या राज्यातील १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने देखील जनहिताची कामं केलेली नाहीत. जिल्ह्याची कामं तर सोडा त्या मंत्र्यांनी साधी स्वतःच्या मतदार क्षेत्रातील सुद्धा विकासाची कामं केलेली नाहीत. तसेच हे मंत्री शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांना खूप वाईट वागणूक देत आहेत. त्यांच्यामुळे एकासुद्धा कार्यकर्त्याचं समाधान झालेलं नाही आणि ते मंत्री एखादा मेळावा सुद्धा घेत नाहीत. तसेच भद्रावती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वेळ देतात, परंतु प्रत्यक्ष प्रचाराला येतच नाहीत असे विभागीय मेळाव्यात सडकून आरोप केले.

उपस्थितांना संबोधित करताना धानोरकरांनी आवाहन दिलं की, शिवसेनेच्या १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने जरी काम केलं असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. तसेच शिवसेनेचे मंत्री भाजप सोबत संधान बांधून आहेत. त्यामुळे शिवसेना आत्ताच सत्तेतून बाहेर नाही पडली तर आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे आपण निवडणूक लढण्याच्या लायकीचे राहणार नाही असा संदेश वजा इशारा पक्ष नैतृत्वाला दिला आहे. आपल्या पक्षाचं नियोजन शून्य असल्यामुळे आपण अधोगतीला जात आहोत असं आमदार बाळू धानोरकर भर मेळाव्यात बोलले आणि सर्वानाच चक्रावून सोडलं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x