2 May 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

BREAKING | राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई, ०७ ऑगस्ट | काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याची चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि त्यानंतर युतीच्या बातम्यांनी पुढं जोर पकडला होता. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावण्याची शक्यता आहे.

कारण कालच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज यांच्यासोबत झालेल्या भेटीतील तपशीलावर चर्चा करणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मनसे-भाजपच्या युतीला वेग आल्याचं बोललं जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि इतर नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. इतक्यात काही संघटनात्मक बदल होतील असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP state president Chandrakant Patil reached at Delhi to meet PM Narendra Modi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या