6 May 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

नरेंद्र मोदी काही भारताचे राजे नाहीत | भाजप खासदाराने प्रतिक्रिया देताना झापलं

PM Narendra Modi

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट | पंतप्रधान मोदी हे काही भारताचे राजे नाहीत”, हे शब्द विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नाहीत तर भाजपाच्या एका खासदाराचे आहेत. विशेष म्हणजे तुम्ही मोदीविरोधी आहात असं म्हटल्यानंतर एका भाजपा समर्थकालाच या शब्दांमध्ये थेट ट्विटरसारख्या सार्वजनिक माध्यमातून हे खडे बोल या खासदाराने सुनावले आहेत.

स्वामी यांनी अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी म्हणजेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर टीका केली. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणणारे जयशंकर आणि डोवाल हे दोघे कधीतरी देशाची माफी मागतील का? मोदी समवयस्क राजकारण्यांवर विश्वास न ठेवता अशा राजकारण्यांवर विश्वास ठेवत असल्याने त्यांना मुक्तपणे निर्णय घेण्याची सूट देण्यात आलेली. आता आपण आपल्या सर्व शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवून बसलोय,” असा टोला स्वामींनी लगावला.

यावर एकाने प्रतिक्रिया देताना स्वामींना मोदी विरोधी म्हटलं. “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्ही मोदी आणि सरकारने काही चुकीचे निर्णय घेतल्यावर जी टीका करता त्यासाठी मी तुम्हाला पाठिंबा देत राहील. मात्र आता तुमचे प्रत्येक ट्विट त्यांच्याविरोधात असते. हे असं वाटतंय की तुम्ही मोदीविरोधी झाला आहात कारण त्यांनी तुम्हाला तुमचं आवडतं मंत्रालय दिलं नाही,” असं या चाहत्याने म्हटलं.

त्यांनतर स्वामी चांगलेच संतापले आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मोदी सरकारच्या आर्थिक आणि पराष्ट्र धोरणांच्या मी विरोधात आहे. मी यासंदर्भात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. तुम्ही कधी पार्टीसीपेटरी डेमोक्रसीबद्दल ऐकलं आहे का? मोदी काही भारताचे राजे नाहीत,” असा टोला स्वामींनी ट्विटरवरुन लगावला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Narendra Modi is not a King of India said BJP MP Subramanian Swamy news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x