1 May 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार आग्रही नाही ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे | रोहित पवारांचा टोला

MLA Rohit Pawar

पुणे, १६ ऑगस्ट | राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच याबाबत आग्रही नाही, तुम्ही का आग्रह धरता, असे रणपिसे यांना सुनावले. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार पवार म्हणाले, की सरकार आग्रही नाही हे खरं आश्चर्याची गोष्ट आहे. आग्रह करणे हे जर अपेक्षित आहे. तर आपण खूप आग्रह करू शकतो. संविधानाने दिलेले राज्यपाल पद हे खूप मोठे आहे. संविधानाच्या चौकटीत एखादी गोष्ट असेल तर ती प्रलंबित राहू नये, याची जबाबदारी राज्यपाल कार्यालयाची आहे. याबाबत न्यायालयानेही रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या बाबत आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकरात लवकर होतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी संसदेच्या परिसरात येऊ नये, यासाठी संसदेच्या प्रवेशद्वारा समोर प्रथमच कंटेनरची भिंत उभी करण्यात आली होती. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की महाराष्ट्रात कोणत्याही एखाद्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी काही जण बारामतीत येऊन आंदोलन करत असतात. आपल्या आंदोलनाचा संदेश पवार साहेबांपर्यंत पोहोचेल व त्यावर योग्य ते निर्णय घेतील, असा विश्वास आंदोलकांना असतो. मात्र असे आंदोलन होत असताना पोलीस बळाचा व कंटेनरचा वापर कधीही केला गेला नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Rohit Pawar talked on 12 MLC appointment news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या