3 May 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

संजीवनी काळे वडिलांसह कृष्णकुंजवर | तर राज ठाकरे पुण्यात | भेट नेमकी कोणाशी?

Raj Thackeray

मुंबई, २१ ऑगस्ट | घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.

संजीवने काळे वडिलांसह कृष्णकुंजवर तर राज ठाकरे पुण्यात (MNS leader Gajanan Kale’s wife Sanjeevani Kale reached to Kushnakunj to meet Raj Thackeray in Mumbai) :

दरम्यान आज सकाळी संजीवनी काळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल झाल्या. संजीवनी काळे यांच्यासोबत त्यांचे वडीलही आले आहेत. गजानन काळे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात त्या राज ठाकरे यांच्याकडे दाद मागण्यासाठी याठिकाणी आल्या आहेत. (Sanjeevani Kale reached Mumbai to meet Raj Thackeray)

दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे संजीवनी काळे आपले गाऱ्हाणे कोणासमोर मांडणार, हे पाहावे लागेल. तसेच या सगळ्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून गजानन काळेंवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कदाचित त्या शर्मिला ठाकरे यांच्याकडे याविषयासंदर्भात अधिक माहिती देऊन न्यायाची अपेक्षा करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS leader Gajanan Kale’s wife Sanjeevani Kale reached to Kushnakunj to meet Raj Thackeray in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या