28 April 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

ओबीसींचे राजकीय आरक्षण | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक

OBC Reservation

मुंबई, २७ ऑगस्ट | राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. तर ओबीसी संघटनांचे नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक – Uddhav Thackeray called all party leaders meeting over OBC reservation in local body election :

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे नवा राजकीय व सामाजिक पेच निर्माण झाला आहे. पुढील वर्षात राज्यात मुंबईसह १८ महानगरपालिका, अनेक नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे येणार आहे. त्यावर कसा मार्ग काढायचा, यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ओबीसी आरक्षण हवं – देवेंद्र फडणवीस
येत्या फेब्रुवारी महिन्यात 70 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्याआधी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य सरकारची नियत साफ असेल तर, ओबीसी समाजाला आरक्षण नक्की मिळेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray called all party leaders meeting over OBC reservation in local body election.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x