6 May 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | 50 टक्के परतावा मिळेल, 99 रुपयांचा शेअर खरेदी करून होल्ड करा - NSE: NTPCGREEN Yes Bank Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी; बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा चाकू, तलवार अशी हत्यारे घेऊन कार्यकर्त्यांच्या घरात घुसून हल्ला

Sagar Khot

इस्लामपूर, ०७ सप्टेंबर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबवे येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडला.

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा चाकू, तलवार अशी हत्यारे घेऊन कार्यकर्त्यांच्या घरात घुसून हल्ला – Sagar Khot has attacked on youth at Islampur :

रविकिरण राजाराम माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत,अभिजित भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी (तिघे रा. इस्लामपूर) आणि सत्यजित कदम (शिराळा) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.भा. दं. वि.कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ आणि शस्त्र कायदा ४(२५) अन्वये हा गुन्हा नोंद झाला आहे.या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

माने रात्री आपल्या कुटुंबासोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी सागर खोत आपल्या साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला होता. तू सदाभाऊंवर टीका करतोस का, तुला मस्ती आली आहे का, असे म्हणत माने यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांचे कुटुंबीय मध्ये पडल्याने हल्लेखोरांनी रविकिरण यांना ढकलून देत धक्काबुक्की करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने या चौघांनी चारचाकी मोटारीतून तेथून पोबारा केला. कासेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Sagar Khot has attacked on youth at Islampur.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या