1 November 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

बंद करून दाखवलं'चं श्रेय घेणार का? | आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

MLA Nitesh Rane

मुंबई, ११ सप्टेंबर | मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना विमा बंद केल्याच्या कारणावरून खोचक पत्र लिहिल आहे. कोविडच्या कठीण प्रसंगांमध्ये या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूक बजावलं. या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली तेव्हा, “करून दाखवलं” अशा घोषणा देण्यात आल्या. मग आता हा विमा बंद केल्यानंतर याचे श्रेय कोण घेणार, असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

बंद करून दाखवलं’चं श्रेय घेणार का?, आ. नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल – BJP MLA Nitesh Rane wrote a letter to CM Uddhav Thackeray over few questions :

काय आहे नितेश राणे यांच्या पत्रात?
आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविडकाळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’चीही जगभर वाहवा ‘मिळवून’घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात, अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे, हे आपणास माहीत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.

माध्यमांतून बातम्या झाल्या होत्या प्रकाशितजेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा त्याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेव्हा ही योजना बंद झाली, याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का, असा सवाल पत्रातून राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane wrote a letter to CM Uddhav Thackeray over few questions.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x