2 May 2025 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार? | कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढत देणार

Nilesh Rane

कुडाळ, १३ सप्टेंबर | कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर 2019 मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला.

निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार?, कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढत देणार – Nilesh Rane may contest assembly election from Kudal Malvan constituency :

2014 ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या वैभव नाईक यांना 71 हजार, काँग्रेसच्या नारायण राणे यांना 60,500, तर भाजपच्या बाब मोंडकर यांना 4500 आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 मते पडली होती. नारायण राणेंचा अनपेक्षित पराभव करून वैभव नाईक हे राज्यात जाएन्ट किलर म्हणून गणले जाऊ लागले.

माजी खासदार निलेश राणे सुद्धा विधानसभेच्या आखाड्यात:
दरम्यान, निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच हे साकडे घालण्यात आल्याने, आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवतील हे या निमित्ताने बोललं जात आहे. यावेळी निलेश राणे यांनी चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केंद्रामध्ये वजन आहे. त्यामुळेच आता चिपी विमानतळ मार्गी लागतोय. कोण हौसे, गवसे, नवसे खासदार झालेत म्हणून विमानतळ होत नाही, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nilesh Rane may contest assembly election from Kudal Malvan constituency.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या