2 May 2025 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

EPFO सदस्यांसाठी महत्वाची सूचना | अन्यथा रिकामं होईल खातं | वाचा सविस्तर

EPFO holders

मुंबई, १८ सप्टेंबर | नोकरदार नेहमीचे खर्च भागवून थोडी बचत करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात (EPF Account) जमा होत असते. जी त्याला भविष्यात उपयोगी पडते. या रकमेबाबत त्याला खूप जागरुक रहावं लागतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) आपल्या 6 कोटी खातेदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. जर तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर ही सूचना किंवा अर्लट तुमच्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. ईपीएफओच्या खातेदारांची खासगी माहिती आणि इतर खासगी अॅप्लिकेशन्स यांच्या संदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून हा अलर्ट दिला आहे.

EPFO सदस्यांसाठी महत्वाची सूचना, अन्यथा रिकामं होईल खातं – EPFO never asks it their members to share their personal details so stay alert and beware of fraudsters :

‘EPFO च्या वतीने फोन कॉल करून कधीही तुम्हाला UAN नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर किंवा बँक खात्याची माहिती विचारली जात नाही. ईपीएफओ कुठल्याच खातेदाराला फोन कॉल करत नाही,’ असं ट्वीट ईपीएफओने केलं आहे. ईपीएफओच्या नावाने खातेदारांना खोटे कॉल (EPF account beware of Falls Telephone Calls) करून त्यांची आर्थिक लूबाडणूक करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ईपीएफओने आपल्या खातेदारांना जागरूक करण्यासाठी हा अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर ईपीएफओच्या मूळ वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या वेबसाइटपासूनही सावध रहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

आपल्या खातेदारांना सावध करण्यासाठी ईपीएफओ कार्यालय नेहमी ट्विटर हँडल किंवा एसएमएसच्या माध्यमातून मेसेज पाठवत असते. त्याचाच भाग म्हणून हे ट्वीट केलं आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन करून आपल्या बँकेच्या किंवा पीएफच्या अकाउंटचे डिटेल्स मागितले जातात. त्याचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक खात्याताली रक्कम काढून घेतली जाते अशी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

EPFO issues IMPORTANT alert for 6 crore PF account holders :

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: EPFO never asks it their members to share their personal details so stay alert and beware of fraudsters.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या